काल रविवार होता म्हणून ट्रेन मधे गर्दी कमी होती समोर एक पोरग बसलं होत. बराच वेळ होतता समोर हसून जरा स्माईल दिली. मग लगेच त्याने विचारले काय करता तुम्ही ? मी सहसा मी कुठे काम करतो हे सांगत नाही अनोळखी लोकांना आणि माझ्या वेषभूषेवरून तर लोकांना खरंच वाटत नाही मी नक्की कुठे काम करत असेल ते.
मी त्याला असच सांगितले मी एका कॉल सेंटर ला आहे. लगेच त्याने सॅलरी विचारली मी म्हणालो १५ हजार. ते ऐकताच त्याचा चेहरा खुलला मला म्हणाला जरा वेळ आहे का येणाऱ्या "१५ मिनिटात तुमची जिंदगी बदलून जाईल" मला अंदाज आला आता हा काय सांगणार त्याचा मी त्याला म्हणालो कि नको मला हीच जिंदगी हवीय नकोय बदल. बिचारा हिरमुसला. तरी एक कार्ड दिले आणि म्हणाला कि ज्यावेळेस आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल त्यावेळेस कॉल कर. मग मी त्याला माझं कार्ड दिल म्हणालो हि तुझी जिंदगी बदलविण्याची कंपनी बंद पडली तर कॉल कर मला. तर तो म्हणाला ३ वर्षांपासून आहे सुरु नाही पडत बंद. मी म्हणालो ठीक आहे.
मग जरा आठवला बारावी झाल्यावर आमच्या इथल्या एका पोराने मला इचलकरंजीला नेले होते "डिवोसॉफ्ट" च्या एका शोला त्यात ज्यांनी ज्यांनी जास्त मेंबर जॉईन केले त्यांना डायमंड , सिल्वर गोल्ड असं काय काय देऊन भारी फिलिंग देत होते.
त्यातले ते डायमंड वाले पोर सांगायचे मी अगोदर बीएसी करत होतो पण जॉब बरोबर हे पण केले आज बीएसीवाल्या पोरांपेक्षा मी जास्त कमावले आहेत. दुसरं म्हणायचा मी इंजिनीरिंग सोडून हेच केले आज माझ्या हाताखाली सातारा , कोल्हापूर आहेत राईट साईड ला १०० लेफ्ट साईड ला १०० आहेत. मला पण वाटलं बस आता आपण हेच करायचे आणि एक ढासू स्पीच द्यायचे. पण फि ऐकली ७००० रुपये तर सगळी स्वप्न तिकडेच गायब.
पण ह्या डिवोसॉफ्टच्या पोरांनी २०१० ते २०१३ पर्यंत इतकं बोर केले होते बाकीच्या पोरांना कि त्या डिवोसॉफ्टची पोर बघितली कि बाकीची पोर पळून जायची मोबाईल स्विच ऑफ करायची. अश्याच डिवोसॉफ्टचे काही किस्से.
ग्रुप मधलं एक पोरग नादी लागले होते दिसेल तिकडे दिसेल त्याला तेच सांगायचं जॉईन कर लाईफ बदलून जाईल. शेवटी ग्रुपमधली काही पोर म्हणाली बार सांग काय आहे बिसिनेस प्लॅन तर तो म्हणाला आता नाही संध्याकाळी आमचे एक सर येतील ते सांगणार. पोर म्हणाली हो. झालं संध्याकाळी सगळी पोर जमली हॉस्टेल वर त्यांचा सर आला होता ( सर कुठला शेंबडं पोरग होता कॉलेज सोडून हे धंदे करणारे) संध्याकाळ होती तरी हा "सर" सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणाला मग हि बाकीची पोर लगेच हसली आणि "गुड इव्हनिंग" म्हणाली. तर त्याने अजून स्माईल देऊन म्हणाला " आय क्नो आता संध्याकाळ पण डिवोसॉफ्ट मधे प्रत्येक वेळ हि गुड मॉर्निंग असते म्हणजे प्रत्येक वेळी कामासाठी नवी सुरुवात. आणि त्याने कंपनीची माहिती द्यायला सुरुवात केली तेवढ्यात
या मित्राने वडापाव आणि स्प्राईट आणून ठेवले होते ते प्रत्येका समोर ठेवले जस समोर आलं तसं तुटून पडली त्याच्यावर वडापाव तो "सर" बिचारा पचका झाल्यामुळे गप राहिला आणि या मित्राकडे कटाक्ष टाकला ( बहुतेक म्हणला असेल कसली क्लायंट शोधले आहेत) मग ह्यातल्या एका पोरगा वडापाव आणि स्प्राईट खात पित म्हणाला
आर ती "स्नेहलच" काय झाला रे आज दिसली होतो बसस्टॉप वर उभी होती.
लगेच दुसरा म्हणाला "आर आता लय राडा दिसती राव" पहिल्यांदा एवढी नव्हती खास.
हे ह्यांचं चालू होत आणि तो डेवोसॉफ्ट वाला मित्र आणि त्याचा सर गप उभे होते. डेवोसॉफ्ट वाल्या मित्राला वाटलं थांबेल ह्यांचं आता पण ह्यांचं थांबत नव्हतं म्हणून त्याने मधेच म्हटलं "सर बघा काय सांगत आहेत"
त्या सर ला पण बरे वाटले मग त्याने स्टार्ट केले
येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघत आहेत. प्रत्येकाला प्रश्न विचारला
पहिला पोरगा- मी कुठेच नाही बघत "होईल ते जाईल" मी नाय लय टेन्शन घेत.
दुसरा पोरगा- मी मला पुण्यात बघतो
तो सर म्हणाला पुण्यात बघतो म्हणजे
दुसरा पोरगा आता सातारला तर काय जॉब लागणार मग पुण्यातच जायला लागणार ना. सर शॉक दुसरं पोरग रॉक्स
तिसरं पोरगा (हे जरा सिरीयस होत )- मी स्वतःला "आयएएस" म्हणून बघतो.
त्या सरने लगेच आवरते घेत सांगायला सुरवात केली
मी पण अगादर असाच होतो मला पण चांगला जॉब करायचा होता पण मधेच " डिवोसॉफ्ट " आले आणि माझी लाईफ बदलली. त्याने त्याची स्टोरी सांगितली डिग्रीच्या पाहिल्यावर्षी मी खूप "नेबळा" होतो भ्यायचो सगळ्याला काही कमवत नव्हतो. पण एकदा मी डिवोसॉफ्ट जॉईन केले आणि आज मी इथे आहे. मी कॉलेजला जातच नाही फुल टाइम हेच करतो.
डिवोसॉफ्ट वाला दुसरा मित्र अर्धी लढाई जिंकल्यागत उभा राहिला छाती एकदम फुगली. सगळी पोर पण म्हणाली "भारी भारी"
सर ला पण समजले पोर इम्प्रेस झालेत मग त्याने अजून एक डाव टाकला
तुम्हाला जर आता १ कोटी भेटले तर काय करणार
पहिला पोरगा- आईघातली एवढे भेटले तर मी आधी खूप वडापाव खाणार आता वडापाव खाऊन तोंडाला लय चव सुटलीय राव हाय ना ? सगळी पोर लै जोरात हसली परत सरचा जोरात "वडा" झाला होता बिच्यार्याची मान खाली गेली. तरी पण न हारता दुसऱ्याला विचारले
दुसरा पोरगा- मी काय नाय ते पैशे ठेवायला बॅग आणायला स्टॅन्ड वर जाईन त्या सरची मान अजून खाली गेली तोंडात मारल्यागत तिसऱ्या पोराला विचारले
तिसरा पोरगा- मी ते पैशे बँकेत ठेवीन
ह्या उत्तराने त्याले जरा बरा वाटले मग त्याने विचारले आता हा विचार करा कि इतके पैसे कुठून भेटणार ? कोण फ्री मधे तर देणार नाही.
मग त्याने प्लॅन सांगितलं ७००० हजार रुपये भरायचे आणि मेंबर जॉईन करायचे ५ मेम्बर झाले कि २५०० भेटणार मग जितके जास्त सायकल्स तितके पैसे. आणि एक कॅलक्यूलेशन सांगितले रोज फक्त तीन तास द्या आणि दोनवर्षात करोडपती व्हा प्लस ६५ कॉम्पुटर कोर्स आणि इंटरनेटवर ६० एमबी जागा जगात कुठेच अशी ऑफर नाही भेटत. अजून बरेच काय काय बोलबच्चन दिले होते.
पोर जरा इम्प्रेस झाली. आणि म्हणाली बघू होवुया जॉईन.
मग त्याने लगेच विचारले मग पैसे कॅश ने देणार का चेक ने
पैश्याच नाव ऐकताच सगळे जमिनीवर आले
पहिले पोरग- सर तुमचे किती मेम्बर आहेत
लगेच तो म्हणाला ५९
मग सर असं करा माझे पैशे तुम्हीच भरा मी माझे पैशे आलेकी तुम्हाला देईन रिटर्न
सर गडबडला त्याला काय बोलावे आणि काय नाही बोलावे हे समजेच नाही तरी वेळ मारत म्हणाला करू आपण कायतरी मॅनेज
हे ऐकताच बाकीची पोर पण तेच म्हणाली सर आमचेपण पण तुम्हीच भरा.
आतातर त्याची खूप अवस्था खराब झाली होती बिचारा शांत उभा राहिला दुसरा डिवोसॉफ्ट वाला मित्राला पण वाईट वाटले त्याचा सर चा अपमान झाला म्हणून. पण तो तरी काय करणार. तरीपण तो सर हिम्मत हरला नव्हता म्हणाला परत भेटू आपण. "गुड मॉर्निंग" आणि तो सर गेला. मग बाकीच्या पोरांनी रात्रभर डिवोसॉफ्ट वाल्या मित्राची लै काढली.
त्यानंतर पण तो सर सारखे कॉल करायचा, मग पोर हालय हळू हा सर दिसला कि पळून जायची पुढे हळू हळू या डिवोसॉफ्ट वाल्या मित्राने पण नाद सोडला (घरून त्याला जोरात भेटले शॉट)
थोड्या वर्षांनी डिवोसॉफ्ट बंद पडली. मग त्या सर ने कशीबशी परत डिग्री केली पूर्ण , घरून सांगितले फक्त अभ्यास करायचा बाकी धंदे बंद. त्याने गाडीवर डिवोसॉफ्टचे स्टिकर लावले होते ते पण काढले ( गाडीचा शो गेला डेवोसॉफ्टचा डाग दिसायचा)
तो सर पण पुण्यात आला जॉब साठी लै फिरला कॉलसेंटर , बॅकऑफिस , मग शेवटी विमाननगर मध्ये एका कॉलसेंटर ला जॉब भेटला.
तर सांगायचं तात्पर्य एकाच कि असल्या भंगार चैन मार्केटिंग कंपनीच्या मागे लागून आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया घालवू नका ( देयर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस )